बेंगळूर – तरुणायीने प्रेरणा घ्यावी अशी बातमी समोर आली आहे. एका 62 वर्षीय आजीने साडीमध्ये 6 हजार फूटांच्या शिखरावर चढाई केली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील अत्यंत उंच आणि ट्रेकिंगसाठी सर्वात अवघड शिखरांपैकी एक अगस्त्याकुंडमवर या आजीने चढाई केली आहे. आजीच्या या रोप क्लायम्बिंगची चर्चा सध्या सर्वीकडे सुरु आहे. नागरत्नाम्मा यांच्या रोप क्लायम्बिंगचा व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्यांचे मोठय़ा प्रमाणावर कौतुक होत आहे.
View this post on Instagram
नागरत्नाम्मा असे शिखरावर चढाई करणाऱ्या आजीने नाव असून त्यांनी 16 फेब्रुवारी रोजी साडी नेसलेल्या स्थितीत या शिखरावर रोप क्लायम्बिंग केले आहे. नागरत्नाम्मा त्यांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांसोबत बेंगळूरमधून येथे पोहोचल्या होत्या. यांचा हा कर्नाटकबाहेरील पहिलाच प्रवास होता. अगस्त्यारकुडम हे केरळमधील दुसरे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची 1 हजार 868 मीटर म्हणजेच 6 ह जार 129 फूट इतकी आहे.
अगस्त्यारकुडम या उंच शिखवर चढाई केल्यानंतर नागरत्नम्मा म्हणाल्या माझ्या विवाहाला 40 वर्षे झाली आहेत. या वर्षांमध्ये मी कौटुंबिक जबाबदार पार पाडण्यात गुंतून केले होते. परंतु आता माझी मुले मोठी झाली असून स्वतःच्या पायांवर उभी आहेत. अशा स्थितीत मी आता माझ्या स्वप्नांची पूर्तता करू शकते असे त्यांनी म्हटले आहे.