सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आणखी नव्या १९ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ६१८ झाली आहे. वडगाव येथील रुग्णाचा म्रुत्यू झाला आहे.
सातारा जिल्हयातील १९ जणांचे रिपोर्ट शुक्रवारी रात्री उशिरा करोनाबाधित आले आहेत. तसेच कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये वडगांव (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय पुरुष करोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदूच्या पक्षाघाताची लक्षणे होती, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यातील होळ येथील 7 व तांबवे येथील 6. कराड तालुकयातील तुळसण येथील 5. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 1. अशा १९ जणांचा समावेश आहे.यामध्ये ३ ते ६५ वर्षे वयोगटातील ११ पुरुष व ८ महिलांचा समावेश असून एक जण प्रवास करुन आलेला व अठरा जण करोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील आहेत.