61 उपजिल्हाधिकारी बनले अपर जिल्हाधिकारी

नगर  – राज्यातील 61 उपजिल्हाधिकारी सवंर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात नगरमध्ये काम केलेल्या पाच व सध्या कार्यरत असलेल्या दोन अशा एकूण सात जणांचा समावेश आहे.

नगरमध्ये जिल्हा पुर्नवसन अधिकारी म्हणून काम पाहणारे महेश पाटील,विशेष भूसंपादन अधिकारी अजय मोरे हे दोघे जण तर यापूर्वी रोंहयो उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले जितेंद्र वाघ,संगमनेरचे प्रांताधिकारी म्हणून काम केलेले जितेंद्र काकुस्ते, तसेच नगरचे प्रातांधिकारी म्हणून काम केलेले वामन कदम व राजेंद्र मुठे, एमआयडीसीमध्ये काम केलेले उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांचा समावेश आहे. कदम सध्या जळगाव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत,तर मुठे हे मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.