तालुक्‍यातील चार ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 61.41 टक्के मतदान

कराड – तालुक्‍यातील सवादे, करवडी, शिरगाव व पेरले या चार ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या ग्रामपंचायतीसाठी आज रविवारी मतदान पार पडले. यावेळी दिवसभरात तब्बल 61.41 टक्के मतदान झाले. नऊ जागांसाठी एकोणीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे.

कराड तालुक्‍यातील सवादे ग्रामपंचायतीतील एकूण तीन वॉर्ड मध्ये दिवसभरामध्ये मतदान झाले. यावेळी सवादेतील महादेव वॉर्डमध्ये एकूण 75.25 टक्के, बाबा वॉर्डमध्ये 65.65 टक्के, हनुमान वॉर्डमध्ये 67.49 टक्के मतदान झाले. तर पेरलेत हनुमान वॉर्डमध्ये 85.63 टक्के मतदान झाले.

या ठिकाणी एकूण 696 मतदारांपैकी 596 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिरगाव येथे गांधी वार्डमध्ये एकूण 575 मतदारांपैकी 448 मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी 77.91 टक्के मतदान झाले. करवडीत हनुमान वॉर्ड क्रमांक एकमध्ये सर्वाधिक कमी 5.20 टक्के मतदान झाले. एकूण चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी 5 हजार 235 मतदारांपैकी 3 हजार 215 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Leave A Reply

Your email address will not be published.