604 शंकास्पद अन्न पदार्थांचे नमुने तपासासाठी ताब्यात

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या “फेस्टीव्हल ड्रायव्ह’ या विशेष मोहिमेअंतर्गत सुमारे 604 शंकास्पद अन्न पदार्थांचे नमुने तपासासाठी घेतले आहेत. पुणे जिल्हा आणि विभागात मिळून एफडीए प्रशासनाने ही कारवाई केली. सर्व अन्नपदार्थांचे नमुने राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिकांकडून मिठाईयुक्‍त पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या काळात मागणी जास्त असल्याने विक्रेत्यांकडून नफा कमवण्याच्या उद्देशाने भेसळीचे प्रकार घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी एफडीए प्रशासनाकडून दिवाळीत खाद्यपदार्थांची तपासणी केली जाते.

दरवर्षी दिवाळी सणापूर्वी प्रशासनाकडून अन्न पदार्थांची तपासणी मोहीम हाती घेतली जाते. यंदा ऑगस्टपासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. दि. 20 ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबरदरम्यान एफडीए प्रशासनाने पुणे जिल्ह्यातील 175 शंकास्पद नमुने ताब्यात घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.