600 ग्रॅम वजन असलेल्या रायपुर पेरूची मार्केट यार्डात आवक

बिया कमी असल्याने नागरिकांकडून मागणी

पुणे- आकाराने मोठा, चवीला गोड आणि तब्बल 600 ग्रॅम वजन असलेल्या रायपुर पेरूचा हंगाम सुरू झाला आहे. रविवारी मार्केट यार्डातील फळ बाजारात तब्बल 1 टन आवक झाली. बारामती, सातारा जिल्ह्यातून या पेरूची आवक झाली आहे. त्यास घाऊक बाजारात प्रती किलोस दर्जानुसार 40 ते 100 रुपये भाव मिळत आहे.
या पेरुचे पिक सुरूवातीला छत्तीसगढ राज्याची राजधानी असलेल्या रायपुर भागात घेण्यात आले. त्यामुळे त्यास रायपुर पेरू म्हणतात. या पेरुची आवक मार्केटयार्डात गेल्या आठवड्यापासून सुरु झाली आहे. ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
याबाबत पेरुचे व्यापारी संतोष ओसवाल म्हणाले की, मार्केट यार्डात पूर्वी या पेरूची तुरळक प्रमाणात आवक होत होती. मात्र, मागील पाच वर्षांपासून आवक वाढत चालली आहे. कमी बिया असल्याने हा पेरु दातांना
जास्त त्रास न होता खाता येता, या कारणामुळे नागरिकांकडून याला मागणी आहे. याबरोबरच ज्युस विक्रेते आणि फ्रुट स्टॉल विक्रेत्यांकडून याला मागणी आहे. बाजारात येणाऱ्या प्रत्येक पेरुला आकर्षक पॅकींग आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)