नामुष्की! स्पेअरपार्टअभावी 60 बसेस बंद

पीएमपीची अवस्था सुधारणार तरी कधी?

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यातील सुमारे 60 बसेसचे संचलन बंद करण्यात आले आहे. स्पेअरपार्ट उपलब्ध होत नसल्याने बसेस बंद ठेवण्याची नामुष्की पीएमपी प्रशासनावर ओढावली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बसेस आहेत. प्रत्येक डेपोतील सुमारे 3 ते 4 बसेसचा या “बंद’ प्रकारात समावेश असून देखभाल दुरुस्ती आणि स्पेअरपार्ट उपलब्ध नसल्याचे अधिकृत कारण देण्यात आले आहे. ताफ्यातील सुमारे 150 पेक्षा जास्त बसेस आयुर्मान संपलेल्या आहेत. त्यामुळे अनेक बसेस रोज बंद पडत आहेत. त्यामध्ये आता स्पेअरपार्ट उपलब्ध न झालेल्या बंद करण्यात आलेल्या बसेसची भर पडली आहे.

देखभाल दुरुस्तीअभावी बंद राहणाऱ्या बसेसची दुरुस्ती करुन मार्गावर सोडण्यात येतात. तर, स्पेअरपार्ट अभावी बंद राहणाऱ्या बसेसबाबत पाठपुरावा सुरू असून बसेस मार्गावर आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
– सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.