पुणे : बेळगाव येथे 27 ते 31 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 75 तास रिले स्केटिंगमध्ये 100 मीटर बॅकवर्ड स्केटिंग यूजिंग टू व्हील्स या प्रकारात 14.84 सेकंदांचा विक्रम नोंदविण्यात आला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या या विक्रमात पुण्याचा व्योम ओंकार जोशी याचाही सहभाग असल्याचे सांगण्यात आले.
व्योम याचे वय अवघे 6 वर्षांचेआहे. 4 वर्षांचा असल्यापासून तो युवराज स्पोर्ट्स ॲकॅडमीमध्ये स्केटिंगचे धडे घेत आहे. त्याला चंद्रकांत बासा यांचे मार्गदर्शन लाभले. बेळगावमध्ये विक्रमी 75 तास रिले स्केटिंगचे आयोजन शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे करण्यात आले होते.