जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३४२ वर
सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मंगळवारी सहा जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह रुग्णसंख्या आता ३४२ झाली आहे.
कृष्णा मेडिकल काँलेजमधील रिपोर्टनुसार रात्री साडेनऊ वाजता पाच जणांचे रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. त्यानुसार नवारस्ता ( पाटण ) येथील १२ वर्षीय सारीचा रुग्ण, वानरवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातील २५ वर्षीय गर्भवती महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील ३० वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज येथील २९ वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील ३४ वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. त्यापूर्वी सायंकाळी वानरवाडी (ता. कराड) येथील २५ वर्षीय युवकाचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला होता.