नायडू रुग्णालयात आयसीयूच्या आणखी 6 खाटा

पुणे – महापालिकेकडून डॉ. नायडू रुग्णालयात पुढील 2 दिवसांत आणखी 6 खाटांचे आयसीयू (इन्टेन्सिव्ह केअर युनिट) उभारले जाणार आहे. त्यामुळे या रुग्णालयात आता 8 आयसीयू बेड असणार आहेत. शहरात करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर पालिकेने या ठिकाणी ससूनच्या मदतीने 2 बेडचे आयसीयू सुरू केले होते.

शहरात धुलिवंदनाच्या दिवशी (9 मार्च) पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर भविष्यात या रुग्णाची संख्या वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पालिकेने डॉ. नायडू रुगणालायत तातडीने आयसीयू उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ससूनच्या मदतीने पालिकेने 2 बेडचे आयसीयू तातडीनं सुरू केले. तसेच आणखी 6 बेड वाढवण्यासाठी तब्बल 56 लाख रुपयांची साहित्य खरेदी केली होती. त्यानंतर हे साहित्य उपलब्ध झाले असून, हे साहित्य जोडून तातडीनं 6 बेड आयसीयू पुढील 2 दिवसांत सुरू केले जाणार आहे.

पुण्याला दिलासा
महापालिका 8 बेडचे आयसीयू सुरू करणार असली, तरी पुण्यात करोनाचे 21 रुग्ण असून त्यातील 1 जण गंभीर आहे. तर 5 जणांचा आजार बरा झाला असून इतर 15 जण ठणठणीत आहेत. त्यामुळे नायडूमधील आयसीयूचा अद्याप वापर झालेला नाही. तसेच पुण्यात आता लॉकडाउन असल्याने तसेच जवळपास लागण झालेल्या प्रत्येकाच्या संपर्कातील प्रत्येकाला विलगीकरन केल्याने रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×