जामखेडच्या 21 छावणीचालक संस्थांना 6 लाखांचा दंड

जामखेड: चारा छावणी सुरू करताना अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या जामखेड तालुक्‍यातील 21 छावणीचालक संस्थांना 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे छावणीचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जामखेड तालुक्‍यातील 50 छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी 45 छावण्या सुरू झाल्या आहेत. नुकतीच पाच छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनाने छावणी सुरू करताना अनेक अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. अनेक छावण्यांत त्यात त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जनावरांचे आवक जावक रजिस्टर अद्यावत नसणे, छावणीतून जनावरे बाहेर घेऊन गेलेल्या व्यक्तीचा अर्ज नसणे, पुरवठा होणारा चारा व पशुखाद्याची नोंद नसणे, त्याचा हिशेब न जुळणे, पंचनामा न करणे, यासह विविध विविध निकषांची पूर्तता न केल्याने ही कारवाई करण्यात आली.

त्यामुळे तालुक्‍यातील सर्वांत जास्त दंड 79 हजार 740 रुपये खर्डा येथील छावणी करण्यात आला आहे. ही छावणी जामखेड तालुका वीट उत्पादक मोटार वाहतूक सहकारी संस्था, जामखेड या संस्थेतर्फे चालविली जात आहे. स्वामी समर्थ मजूर सहसंस्था मोहा या छावणीस 60 हजार 935, पालकमंत्री राम शिंदे यांच्या गावातील चौडी सहकारी सोसायटी वतीने चालवण्यात येत असलेल्या छावणीस 61 हजार 480 रुपये, कै. बाबूराव सखाराम ढवळे या संस्थेच्या जवळा येथील छावणीस 56 हजार 950, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी सेवाभावी संस्थेच्या वतीने मुंजेवाडी येथे चालविण्यात येणाऱ्या छावणीस 44 हजार 905, विश्वकर्मा बहुउद्देशीय सामाजिक संस्था काटेवाडी येथील छावणीस 29 हजार 700, कै. महादेव आबा हजारे प्रतिष्ठान जवळा या संस्थेच्या नान्नज येथील छावणीस 29 हजार 455, मुंजोबा मजूर सहकारी संस्था नान्नज या संस्थेच्या राजेवाडी येथील छावणीस 28 हजार 15, मुंजोबा मजूर सहकारी संस्था जवळा या संस्थेच्या राजेवाडी येथील छावणीस 27 हजार 850, नंदादेवी पाणी वापर सह संस्था नान्नज या संस्थेच्या नान्नज येथील छावणीस 27 हजार 520, संघर्ष सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक प्रतिष्ठान सातेफळ या संस्थेच्या राजुरी येथील छावणीस 24 हजार 800, जय हनुमान प्रतिष्ठान सारोळा या संस्थेच्या खांडवी येथील छावणीस 20 हजार 535, सीना ग्रामप्रतिष्ठान चौडी या संस्थेच्या आघी येथील छावणीस 21 हजार 790, सिद्धिविनायक सेवाभावी संस्था कुसडगाव या संस्थेच्या कुसडगाव येथील छावणीस 21 हजार, घृष्णेश्वर ग्रामविकास बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपरखेड या संस्थेच्या पिंपरखेड येथील छावणीस 17 हजार 995, जय भवानी सहकारी दूध उत्पादक संस्था नायगाव या संस्थेच्या जामखेड येथील छावणीस 5 हजार 500, जय हनुमान प्रतिष्ठान सारोळा या संस्थेच्या सरदवाडी येथील छावणीस 14 हजार 795, बाबूराव सखाराम ढवळे ग्रामविकास प्रतिष्ठान पिंपरखेड या संस्थेच्या हाळगाव येथील छावणीस 11 हजार 500, पुण्यश्‍लोक मजूर सहसंस्था चौडी या संस्थेच्या डिसलवाडी येथील छावणीस 9 हजार, पुण्यश्‍लोक मजूर सहसंस्था चौडी या संस्थेच्या आरणगाव येथील छावणीस 4 हजार 500, तसेच याच संस्थेच्या फक्राबाद येथील छावणीस 4 हजार, अशा 21 छावणी चालकांवर 6 लाख 1965 एवढा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे छावणी चालकांचे धाबे दणाणले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.