जगात गेल्या 24 तासांत 6 लाख 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : जगातील 217 देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. आताही कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जगभरात गेल्या 24 तासांत 6 लाख 38 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 9 हजार 593 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश अमेरिकेत कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट होतआहे. अमेरिकेत दररोज दीड ते दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.त्यामुळे तिथली परिस्थिती अत्यंत वाईट होताना पहायाला मिळत आहे.

वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, आतापर्यंत जगात 5 कोटी, 30 लाख 69 हजार कोरोनाबाधितांची नोंद केली गेली आहे. तर आतापर्यंत 12 लाख 98 हजार 493 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या महामारीतून 3 कोटी 71 लाख लोक बरे झाले आहेत. सध्या 1 कोटी 45 ​​लाख रूग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 95 हजार लोकांची प्रकृती गंभीर आहे.

कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1 लाख 59 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यानंतर भारताचा नंबर येतो. भारतात 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 43 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका आणि भारतानंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो. ब्राझीलमध्ये 24 तासांत 34 हजार नवी प्रकरणे नोंदविली गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.