पुणे – उत्सवांच्या निमित्ताने रेल्वेला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या पुणे विभागातून गोरखपूरसाठी 6 उत्सव विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे-गोखरपूर-पुणे मार्गावर उत्सव सुपरफास्ट विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
पुण्यातून द्वि साप्ताहिक विशेष गाडी 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी आणि शनिवारी सुटणार असून, ही गाडी दुसऱ्या दिवशी गोरखपूर येथे पोहोचेल. तर गोरखपूरहून सुटणारी द्वि साप्ताहिक विशेष गाडी 16 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत दर सोमवारी आणि गुरुवारी सुटणार आहे.
ही गाडी दुसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचणार आहे. अहमदनगर, मडमाड, भुसावळ, भोपाळ, कानपूर, गोंडा आदी ठिकाणी या गाडीला थांबा देण्यात येणार आहे, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.