6 दिवस “नंबर पोर्टेबिलिटी’ बंद

पुणे  – मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सेवेत सुधारणा करण्यासाठी 4 ते 10 नोव्हेंबरदरम्यान ही सुविधा बंद राहणार आहे. त्यानंतर ही सुविधा अधिक चांगल्या प्रकारे 11 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

दूरसंचार नियामक अधिकारीनी म्हणजे ट्रायने ही माहिती जारी केली आहे. 11 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सुधारित योजनेत समान सेवाक्षेत्रात नंबर न बदलता कंपनी बदलायची असेल तर, केवळ 2 दिवस लागतील तर एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये सेवा बदलून नंबर कायम ठेवायचा असेल तर 5 दिवस लागणार आहेत.

अगोदरच्या प्रक्रियेपेक्षा ही प्रक्रिया जलद गतीने आणि कार्यक्षमरित्या होणार आहे. त्यामुळे या संबंधात तांत्रिक तयारी करण्यासाठी ही सेवा 4 ते 10 नोव्हेंबरदरम्यान बंद ठेवली जाणार आहे. संबंधित 6 दिवसांत ग्राहकांनी विनंती केली तरी कसलाही प्रतिसाद मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण ट्रायने जारी केलेल्या पत्रकात केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.