पुणे शहरात 6 कंटेन्मेंट झोन ‘लॉकडाउन’; वाचा नव्या करोनाबाधितांचा आकडा

पुणे – राज्यातील लॉकडाउन 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर महापालिकेनेही याबाबत सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार शहरातील करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या भागांत लॉकडाउनही वाढवण्यात आला आहे.

 

 

शहरातील सुधारित कंटेन्मेंट झोन आयुक्तांनी दि.21 नोव्हेंबर रोजी जाहीर केले होती. त्यात अध्या 6 प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली. त्या सुधारित आदेशात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र, तसेच यापूर्वी परवानगी दिलेल्या अस्थापनांचे नियम कायम राहणार आहेत, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

दरम्यान, शहरात गेल्या चोवीस तासांत 371 नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, चौघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण बाधितांची संख्या 1 लाख 70 हजार 350 झाली असून, 1 लाख 60 लाख 487 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 2,951 स्वॅब टेस्ट घेण्यात आले.

 

एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 5,396 असून, 408 क्रिटिकल बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 242 व्हेन्टिलेटरवर आहेत. एकूण चौघांचा मृत्यू झाला असून, एकजण पुण्याबाहेरील आहे. शहरात आतापर्यंत करोनाने 4,467 रुग्णांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.