50 वर्षापूर्वी आजच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूने ठोकली होती सलग 6 शतके

नवी दिल्ली – क्रिकेटच्या कोणत्याही प्रारुपात शतकांची हॅट्रिक म्हणजे सलग तीन शतके ठोकणे तसे अवघडच काम असते . परंतु श्रीलंका संघाचा दिग्गज खेळाडू कुमार संगकाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन शतकानंतर चौथे शतके ठोकले असते, तर हा कारनामा विश्वविक्रम म्हणून नोंदवला गेला असता.

परंतु दक्षिण आफ्रिकेच्या एका फलंदाजाने आपल्या करियरमध्ये शतकांचा असा काही करनामा केला आहे की ,ज्याचे भागीदार जगात फक्त दोन लोकं आहेत. हा कारनामा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेला आहे. ज्यामध्ये सलग सहा शतके ठोकण्याचा विक्रम केला गेला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू माइक प्रोक्‍टरने केला होता. त्याने हा विक्रम आजच्या दिवशी म्हणजे 5 मार्च 1971 साली केला होता.

माइक प्रोक्‍टरने रोडेशिया संघाकडून खेळताना प्रोविंस विरुद्ध हा विक्रम केला होता. या सोबतच त्याने सलग सहा सामन्यात सहा शतके ठोकण्याच्या बाबतीत दोन दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली. कारण त्याच्यापूर्वी हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन आणि सीबी फ्राई यांच्या नावावर नोंदवला गेला होता.या दोघांनी सुद्धा सलग सहा शतके केली आहेत. 15 सप्टेंबर 1946 साली जन्मलेल्या माइक प्रोक्‍टरला 1970 मध्ये विस्‍डन क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवडले गेले होते.

क्रिकेट मधून निवृत झाल्यानंतर त्याला अंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने मैच रेफरीची जबाबदारी दिली होती. परंतु त्याचा हा कार्यकाळ खुपच वादग्रस्त राहिला. तो माइक प्रोक्‍टरच होता, ज्याने 2007-08 साली झालेल्या बॉर्डर-गावस्‍कर ट्रॉफीच्या सामन्यात, एंड्रयू साइमंड्सवर वर्णभेदी टिप्पणी केल्या प्रकरणी हरभजन सिंगवर तीन सामन्याची बंदी घातली होती. मात्र नंतर ही बंदी मागे घेण्यात आली होती.

21 हजारपेक्षा जास्त धावा ,1400 पेक्षा जास्त विकेट्स
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज माइक प्रोक्‍टर हा देशासाठी फक्त 7 कसोटी सामने खेळला. यामध्ये त्याने 25.11 च्या सरासरीने फक्त 226 धावा केल्या. त्याला 10 डावात एक ही अर्धशतक ठोकता आले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या 48 आहे. परंतु त्याने 7 कसोटी सामन्यात 41 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर एका डावात 73 धावा देऊन 6 विकेट्स ही त्याची सर्वश्रेष्‍ठ कामगिरी आहे. या शिवाय माइकने 401 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये 48 शतके आणि 109 अर्धशतकांचा समावेश आहे.

या बरोबरच त्याने 36.01 च्या सरासरीने 21936 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर 1417 विकेट्सची नोंद आहे. प्रोक्‍टरने 271 लिस्‍ट ए सामन्यांत 6624 धावा आणि 344 विकेट्स सुद्धा मिळवल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये 5 शतकं आणि 36 अर्धशतकं व 27.94 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये 154  धावांच्या सर्वोच्च खेळीचा ही समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.