हिमाचलमधील हिमस्खलनात 6 लष्करी जवानांचा मृत्यू? 

सिमला – हिमाचल प्रदेशमध्ये बुधवारी हिमस्खलन होऊन लष्कराचे 6 जवान मृत्युमुखी पडल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. ती दुर्घटना भारत-चीन सीमेलगत घडली. सीमेलगत गस्त घालणाऱ्या लष्कराच्या 16 जवानांच्या अंगावर बर्फाचे कडे कोसळले. त्यातील 6 जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

ती माहिती समजताच लष्कराने तातडीने बचाव कार्य हाती घेतले. त्यावेळी रमेशकुमार (वय 41) या जवानाचा मृतदेह आढळला. मात्र, इतरांचा शोध तातडीने लागला नाही. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी बुधवारी उशीरापर्यंत मोहीम सुरू होती. भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे (आयटीबीपी) अनेक जवानही त्या परिसरात हिमस्खलनात सापडले. मात्र, त्यांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.