हवाई इंधनात तब्बल 6.5 टक्के वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकारने विमानांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनामध्ये तब्बल साडे सहा टक्के इतकी भाव वाढ केली आहे. त्यामुळे सध्याच तोट्यात चाललेल्या विमान कंपन्यांचे आणखीनच कंबरडे मोडणार आहे. दिल्लीत हवाई इंधनाचा दर प्रति किलो लिटर 59 हजार 400 रूपये इतका होता.

त्यात 3663 रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 6.5 टक्के इतकी आहे. गेल्या महिनाभरात विमानाच्या इंधनात झालेली ही तिसरी वाढ आहे. या आधीही करण्यात आलेली वाढ मोठ्या स्वरूपातील होती. करोना प्रसारामुळे विमान कंपन्यांच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. त्यांच्या मालवाहतुकीचे प्रमाणही कमी झाले आहे.

त्यामुळे या विमान कंपन्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या असतानाच त्यांना हा इंधन दरवाढीचा मोठा फटका बसल्याने त्यांच्यापुढील चिंता आणखीनच वाढली असून आता मोठ्या प्रमाणात विमान प्रवास दर वाढणार आहेत त्याचा फटका सामान्य माणसांनाच बसणार आहे. दरम्यान आता पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ मात्र रोखण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.