नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाच्या नव्या ई-फायलिंग पोर्टलवर 6फेब्रुवारी 2022 पर्यंत 6.17 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरण्यात आली तसेच 19 लाख प्रमुख कर लेखा अहवाल देखील भरण्यात आले.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 6.17 कोटी आयटीआर भरण्यात आले, यापैकी 48 % आयटीआर-1 (2.97 कोटी), 9 % आयटीआर-2 (56 लाख) 13% आयटीआर-3 (81.6 लाख), 27% आयटीआर-4 (1.65 कोटी), आयटीआर-5 (10.9 लाख), आयटीआर-6 (4.84 लाख) आणि आयटीआर-7 (1.32 लाख) आहेत.
विभागाने करदात्यांना आणि सनदी लेखापालांना ई-मेल, एसएमएस आणि ट्विटर द्वारे आपले कर मूल्यांकन अहवाल/आयकर विवरण पत्र, शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता, वेळ न दवडता सादर करण्याचे स्मरणपत्र पाठवले आहे. तसेच कर विवरण पत्र भरताना करदात्यांना काही अडचणी आल्यास त्यांच्या निराकरणात मदत कारण्यास दोन नवे ई-मेल आयडी तयार करण्यात आले आहेत.
ज्या करदात्यांनी/कर व्यावसायिकांनी मूल्यांकन वर्ष 2021-22 करीत आपले कर मूल्यांकन अहवाल किंवा आयकर अहवाल सादर केले नसतील त्यानी आपले कर मूल्यांकन अहवाल त्वरित सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.