नवी दिल्ली – देशात करोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 59 लाख लोक करोनामुक्त झाले असून 9 लाखांच्या आसपास सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 70,496 नवे बाधित सापडले आहेत. तर 964 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 69 लाख 6 हजार 152 लोकांना करोनाची लागण झाली होती. त्यातील 8 लाख 93 हजार 592 जण सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 6 हजार 490 झाली आहे.