केंद्र सरकारने सोमवारी धडक पाऊल उचलत चिनी अॅप टिकटॉकसोबतच 59 अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये कॅम स्कॅनर या अॅपचा सुध्दा समावेश आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा अॅप्सबदल माहिती देणार आहोत ज्याचा वापर तुम्ही कॅम स्कॅनरला पर्याय म्हणून करू शकता. पण, या अॅपचे प्रीमियम फीचर्स वापरण्याकरिता तुम्हाला थोडेसे पैसे खर्च करावे लागतील.
(1) अॅडोब स्कॅन (Adobe Scan)
तुम्ही कॅम स्कॅनर ऐवजी अॅडोब स्कॅन अॅप वापरू शकता. तुम्हाला यामध्ये अनेक फिचर्स मिळतील, ज्याच्या मदतीने तुम्ही महत्वाची कागदपत्रे स्कॅन करू शकता. या अॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला अकाउंच क्रिएट करावे लागेल.
(2)मायक्रोसाॅफ्ट आॅफिस लेन्स (Microsoft Office Lens)
मायक्रोसाॅफ्ट आॅफिस लेन्स अॅपच्या मदतीने तुम्ही महत्वाची कागदपत्रे स्कॅन करू शकता तसेच या अॅपमध्ये फाईल बनविण्याची सुध्दा सुविधा आहे. तसेच या अॅपची साईज वेग-वेगळ्या डिव्हाईसवर अवलबूंन असते.
कॅम स्कॅनर हे अॅप ‘फोटों’चे रूपांतर ‘पीडीएफ’मध्ये (PDF) करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. महत्त्वाची कागदपत्रे, मार्कलिस्ट, देयके आदी स्कॅन करून ते ‘पीडीएफ’मध्ये ठेवल्यास गरजेप्रसंगी वापरता येते. त्यामुळे हे कॅम स्कॅनर’ हे अॅप लोकप्रिय झाले होते.
(3) गूगल ड्राइव (Google Drive)
कॅम स्कॅनरला गूगल ड्राइव एक चांगला पर्याय आहे. या अॅपमध्ये सुध्दा तुम्ही महत्वाची अशी कागदपत्रे स्कॅन करू शकता पण इतर अॅपच्या तुलनेत तुम्हाला यामध्ये कमी फिचर्स मिळतील.
(4) क्लीन स्कॅन (Clean Scan)
क्लीन स्कॅन अॅपमध्ये तुम्हाला कॅम स्कॅनरसारखे फिचर्स मिळतील. या अॅपव्दारे तुम्ही फाईल बनवू शकता. याशिवाय कागदपत्र स्कॅन करण्याची सुविधा मिळेल. या अॅपची साईज 17 एमबी आहे. त्यामुळे हे अॅप तुमच्यासाठी बेस्ट आहे.
(5) स्कॅनर अॅप (Scanner App)
तुम्ही कॅम स्कॅनरला पर्याय म्हणून स्कॅनर अॅप या अमेरिकन अॅपचा वापर करू शकता. या अॅपमध्ये तुम्हाला इलेक्ट्राॅनिक सिग्नेचर, पिन प्रोटेक्शन आणि बेसिक डाॅक्यूमेटं एडिटिग फिचर्स मिळतील. या अॅपची साईज 140 एमबी आहे.