सांगली जिल्ह्यात 57 रस्ते पाण्याखाली

सांगली : जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून आज दिनांक 24 जुलैपर्यंत शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व कडेगाव तालुक्‍यांमधील 57 रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

शिराळा तालुका मांगले सावर्डे रस्ता बंद. पर्यायी मार्ग मांगले चिकुर्डे पुलावरून कांदे सावर्डे पुलावरून सुरू, चरण पथ वारुणी बुरभुशी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही.

बिळाशी-भेडसगाव रस्ता पर्यायी मार्ग कोकरूड मलकापूर राज्य मार्गावरून सुरू, सुजयनगर रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही, भाडूगळेवाडी, येसलेवाडी, गुंडवाडी, खोतवाडी, काशिदवाडी, चिंचेवाडी, खराळे, काळुंद्रे ते राज्यमार्ग रस्ता बंद असून पर्यायी मार्ग नाही.

मिरज तालुका समडोळी-कोथळी रस्ता बंद असून पर्यायी रस्ता सांगली मार्गे सुरू, नांद्रे-ब्रह्मनाळ बंद असून पर्यायी वाहतूक नांद्रे वसगडेमार्गे सुरू, नांद्रे मौजे डिग्रज रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक कवठेएकंद-वसगडे मार्गे सुरू आहे.

पद्माळे-कर्नाळ रस्ता बंद असून पर्यायी पद्माळे सांगली मार्गे वाहतूक सुरू, कवलापूर-कवठेएकंद रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक तासगाव सांगलीमार्गे सुरू आहे. अंकल मळीभाग रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक कोल्हापूर रस्त्यावरून सुरू आहे. कसबे डिग्रज-समडोळी-दानोळी रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक बागणवाट रस्त्यावरून सुरू आहे.

वाळवा तालुक्‍यात कासेगाव-काळम्मवाडी-केदारवाडी-साखराळे-खेडपुणदी रस्ता बंद असून पर्यायी वाहतूक नाही. कासेगाव ते कृष्णाघाट स्मशानभूमीपर्यंत रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही. ऐतवडे खुर्द पारगांव पाणंद रस्ता बंद असून पर्यायी रस्ता नाही.

कडेगाव तालुका आसद चिंचणी रस्ता बंद असून पर्यायी मार्ग आसद मोहिते वडगांव व आसद पाडळी रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.