उबाळेनगरात 57 लाखांचा गुटखा जप्त

लोणीकंद पोलिसांची धडक कारवाई 

वाघोली  – येथील उबाळेनगरमध्ये लोणीकंद पोलिसांनी गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकून 57 लाखांचा साठा जप्त केला आहे. विरमाराम बिजलाजी तराडीया यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे हवेली तालुक्‍यातील गुटखामाफियांचे धाबे दणाणले आहे.

उबाळेनगर येथे तराडीया यांनी उबाळे यांच्याकडून गोडाऊन भाड्याने घेतले होते. या गोडाऊनमध्ये त्यांनी बेकायदेशीर गुटख्याचा साठा केला होता. हा गुटखा हवेली तालुक्‍यात विक्री करीत होते. लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाके यांना उबाळेनगर येथे गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोमवार (दि.29) सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष लांडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी व अन्न सुरक्षा अधिकारी सावंत यांच्या मदतीने मॅपल हॉटेलच्या पाठीमागे बंद गोडाऊनची पाहणी केली. त्यावेळी पोलिसांनी नरेंद्र उबाळे यांच्यासमक्ष गोडाऊनची तपासणी केली. त्यावेळी गोडाऊनमध्ये 57 लाख 56 हजार 752 रुपये किमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला.

यात 45 लाख 23 हजार 520 रुपयांचा महक सिल्व्हर पानमसाला एकूण 28 हजार 272 पॅकेट व 12 लाख 33 हजार 232 रूपये किंमतीचा जर्दा असे एकूण 28 हजार 28 पॅकेट जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक हाके, पोलीस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष लांडे, पोलीस हवालदार बी. एम. सकाटे, पोलीस नाईक. एस. एस. होनमाने, व्यवहारे यांनी केली. दरम्यान,  लोणीकंद पोलिसांनी वाघोली येथे कारवाई केल्यानंतर हवेली तालुक्‍यातील गुटखामाफियांचे साम्राज्य चव्हाट्यावर आले आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याला कर्नाटकची हद्द जोडून असल्यामुळे गुटख्याची आवक होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)