24, 25 फेब्रुवारीला निवडणूक
पवनानगर – जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत येत्या 24 व 25 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भात सर्व तहसिलदारांना आदेश देऊन सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अधिकारी म्हणून अव्वल कारकून, मंडल अधिकान्याची अथवा समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास सांगितले आहे.
करोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात आल्या. यात जिल्ह्यात सरपंचपदाचे आरक्षण सोडत देखील करण्यात आले होते; परंतु शासनाने नंतर राज्यातील जाहीर झालेली सरपंच आरक्षण रद्द करून निवडणुका झाल्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यास सांगितले. जिल्ह्यात नुकतेच नव्याने सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. येत्या 24 व 25 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाच्या निवडणुका होणार आहेत.
पुढील आठवड्यात रणधुमाळी
सरपंचपदाचे आरक्षण सोडतीनंतर 9 व 10 फेब्रुवारी रोजी मावळ तालुक्यातील सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका होणार होत्या. मात्र आरक्षणाविरुद्धात याचिका दाखल झाल्यानंतर 9 आणि 10 फेब्रुवारी निवडणुक्ा स्थगिती करून पुढे ढकल्यात आल्या होत्या. या तर आरक्षण विरोधातील याचिका 15 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळ्यानंतर आता या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे.
कोणत्या गावात कधी निवडणूक..
मंगळवार, 24 फेब्रुवारी
नवलाख उंब्रे, माळेगाव बुद्रुक, वेहरगाव, मळवली, कार्ला, तिकोणा, कोथुर्णे, येलघोल, करंजगाव, चिखलसे, टाकवे बुद्रुक, घोणशेत, आढे, सोमाटणे, पाचाणे, परंदवडी, खडकाळा, साते, आपटी, मोरवे, थुगाव, शिवणे, महागाव, उकसान, नाणे, वडेश्वर, सांगवडे, आंबी, इंगळून.
बुधवार, 25 फेब्रुवारी
ताजे, बऊर, साई, खांड, दारुंब्रे, कुसगाव बुद्रुक, कशाळ, खांडशी, पाटण, वारु, शिवली, मळवंडी ठुले, अजिवली, डाहुली, शिरदे, कुसगाव खुर्द, धामणे, आढले खुर्द, उर्से, गहुंजे, कुसगाव प.मा, कुरवंडे, कांब्रे ना.मा, गोवित्री, येळसे, कुसवली, माळवाडी, आंबेगाव.