57 शहरी जागांवर लक्ष

गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगभराबरोबरच भारतातही शहरीकरणाचा वेग वाढला आहे. अनेकाधिक कारणांमुळे खेड्यांतून शहरांकडे होणारे नागरी स्थलांतर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच आज शहरातील मतदार हा निवडणुकांचा केंद्रबिंदू बनत चालला आहे.

देशात जवळपास 57 अशा जागा आहेत जिथे 75 टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्या शहरी आहे. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने या 57 जागांपैकी केवळ दोनच जागा जिंकल्या होत्या; तर या निवडणुकांत भाजपाने 37 जागांवर विजय मिळवला होता. 18 जागा इतर पक्षांकडे होत्या. जर आपण 2009 मधील या 57 जागांची स्थिती पाहिली तर त्यातील 23 जागा कॉंग्रेसकडे होत्या, 18 जागांवर भाजपा विजयी झाला होता आणि 16 जागा इतर पक्षांनी जिंकल्या होत्या. 2009 मध्ये शहरी जागांमध्ये कॉंग्रेसला मिळालेली मते 29.8 टक्‍के होती, तर भाजपाला 24.8 टक्‍के. गतवेळच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा शहरी जागांमधील मतदार घटला आणि ही टक्‍केवारी 18.3 टक्‍क्‍यांपर्यत खाली आली. त्याचवेळी भाजपाला शहरी जागांमध्ये 39.2 टक्‍के मते मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.