56 इंची बॉक्‍सरने आपल्या आडवाणीनावाच्या कोचलाच ठोसे लावले – राहुल गांधी

भिवानी (हरियाना) – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार सुरू करताना आज हरियानातील भिवानी येथील प्रचार सभेत मोदींवर चौफेर टीका केली. भिवानी जिल्ह्यातून बिजींग ऑलिम्पीकसाठी चार बॉक्‍सर निवडले गेले होते. या पार्श्‍वभूमीवर बॉक्‍सिंगचीच उपमा देत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की या 56 इंची बॉक्‍सरने आपल्याला आडवाणी या कोचलाच बॉक्‍सिंगचे पंच मारून बाद केले.

या बॉक्‍सरकडून लोकांना त्यांचे प्रश्‍न सुटेल अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांना अपेक्षा होती, बेरोजगाराना अपेक्षा होती पण या बॉक्‍सरने भलतीच कामगीरी केली अशी खिल्ली त्यांनी उडवली. नंतर हा बॉक्‍सर रिंग मधून पळून गेला. त्याने नंतर प्रेक्षकातच जाऊन छोटे दुकानदार, छोटे व्यापारी, यांनाच ठासे लगावले. त्यांना शेतकऱ्यांनी अडवले. रिंग मध्ये जा आणि बॉक्‍सिंग करा व आमच्या प्रश्‍नाची उत्तरे द्या असे त्यांनी त्यांना सांगितले पण त्यांनी त्यांनाहीं ठोसे लावले. रिंग मध्ये जाऊन बॉक्‍सिंग करण्यापेक्षा या बॉक्‍सरने नंतर पळ काढला अशी खिल्ली उडवत त्यांनी मोदींवर टीका केली. त्यांच्या या शैलीतील प्रचारालाही येथे चांगली दाद मिळाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.