कर्जत जामखेड तालुक्‍यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान

1 लाख 75 हजार 992 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

जामखेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ सकाळ पासून मतदारांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून, दुपारी 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आतापर्यंत दोन्ही तालूक्यातील 1 लाख 75 हजार 992 जणांनी मतदानाचा हक्क बजावला असुन, आजुनही काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात सोमवारी (ता.21) सकाळी सात वाजता मतदानास सुरवात झाली असून मतदारांनी उस्फूर्तपणे मतदान करायला बाहेर पडत आहेत. सुरवातीच्या सत्रात मात्र मतदान संथगतीने सुरू होते. नऊ वाजेनंतर मतदानात काहीशी गती येऊन सकाळी 12 वाजेपर्यंत 20 टक्के मतदान झाले.

दुपारनंतर ढगाळ वातावरण असले तरी कुठेच पाऊस नसल्याने अनेक मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. हाती आलेल्या आकडेवारी नुसार 4 वाजेपर्यंत 54.99 टक्के मतदान झाले आहे. कर्जत-जामखेडमध्ये एकूण 3 लाख 20 हजार 64 मतदार असून, आतापर्यंत पुरूष मतदार 93 हजार 997 तर महिला मतदार 82 हजार 495 असे एकूण 1 लाख 75 हजार 992 मतदान पार पडले आहे.

या मतदार संघात विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजनसह 9 उमेदवारांचे भवितव्य आज मतयंत्रात बंद होणार आहे. मतदार संघात सध्या शांततेत मतदान सुरु असून कुठे ही अप्रिय घटना घडलेली नाही. काही ठिकाणी मतदारांना नाव शोधण्यासाठी कसरत करावी लागत होती. तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे नावे दोन वेगवेगळ्या केंद्रावर होते. मतदारांना आणण्यासाठी उमेदवाराकडून रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी मशिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने मतदान प्रक्रियेस विलंब लागत आहे. मात्र, असे असताना मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.