पुणे – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ६ ग्रॅम ८५० मिली वजनाचे ५४,८०० रु किंमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून लोणी-काळभोर टोल नाका परिसरात एक इसम मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. यानुसार टोल नाक्यावर सापळा रचून एका इसमास ताब्यात घेतले.
सदरच्या इसमाचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक किट्टू पुजारी (वय 47 वर्षे सध्या रा. कात्रज पुणे, मूळ रा. गिरगाव मुंबई) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिश्यात मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ मिळला.
या मेफेड्रोनची किंमत बाजारात ५४ हजार ८०० रुपये आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात ८ हजार रुपये प्रति ग्रॅम आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी हवेली विभाग सई भोरे पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलीस हवालदार राजेंद्र पुणेकर, विजय कांचन, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांनी केली आहे.