नगर शहरात ५४.२९ टक्के मतदान

सकाळपासून मतदानाचा वेग चांगला असूनही टक्केवारीत घट

मयतांची नावे यादीत; जीवितांची गायब

नव मतदारांनी मतदान केल्यानंतर आपल्या सेल्फी काढून समाज माध्यमांवर टाकून आपला आनंद व्यक्त केला तर काही मतदारांनी सपत्नीक सेल्फी काढून समाजमाध्यमातून इतरांनाही मतदानाचे आवाहन केले. अनेक मतदान केंद्रांवर अपंगासाठी आणलेल्या व्हीलचेअर अपंगांच्या प्रतीक्षेत दिसत होत्या. मात्र त्यांचा वापर शेवटपर्यंत करण्यात आला नाही. मतदानात गोंधळ होण्याच्या घटना नवीन नाहीत त्यातच अनेक मयत मतदारांची नावे मतदार यादीत राहिली असून अनेक जिवंत मतदारांची नावे मात्र मतदार यादीरून गायब झाली असल्याचा प्रत्यय आजही आला.

नगर  – नगर शहरात मतदान उत्साहात पार पडल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले. सकाळी 7वाजता मतदान सुरू झाले. यावेळी पहिला तासभर मतदानाचा वेग तसा कमी होता मात्र साडे आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान मतदानाला वेग आला आणि मतदान केंद्रावर ठिकठिकाणी रांगा दिसू लागल्या. शहरातील मध्यवस्तीतील मतदारांनी रांगालावून सकाळीच मतदान करणे पसंत केले. तर व्यापारी मंडळींनी दुपारनंतर मतदानाला हजेरी लावली, काही मतदान केंद्रावर रात्री पर्यंत मतदान सुरू होते.मात्र वेग चांगला असूनही मतदानाच्या आकडेवारीत घट येवून एकुण नगर शहरात 54.29टक्के मतदान झाले आहे.

शहरातील दादा गौधरी विद्यालय, युनियन ट्रेनिंग कॉलेज, दिल्लीगेट परिसरातील अद्यापक शास्त्र विद्यालय, आयकॉन स्कूल, न्यु आर्टस ऍण्ड कॉमर्स कॉलेज, मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान, चॉंद सुलताना प्रशाला, तर उपनगरात सेंटमोनिका अध्यापन शास्त महाविद्यालय, समर्थ विद्यालय सावेडी, आनंद विद्यालय गुलमोहोर रस्ता, भिंगार मधील फिरोदिया हायस्कूल, शहरातील भाउसाहेब फिरोदिया हायस्कूल आदी ठिकाणी फेरफटला मारला असता याठिकाणी मतदारांच्या रांगा 11 वाजे पर्यंत पहायला मिळाल्या. यावेळेपर्यंत यासर्व ठिकाणी जवळपास 20.96 टक्के इतके मतदान झाले होते. तर दुपारी चारवाजे पर्यंत यासर्व ठिकाणी 45 टक्के इतके मतदान झाल्याचे पहायला मिळाले यानंतर पुन्हा मतदानाने वेग घेतला. एकुणच दिवसभर उमेदवारांचे प्रतिनिधी बुथवर ठ्‌य्या मांडून बसल्याचे चित्र पहायला मिळाले.

शहरात आयकॉन स्कूल आणि दिल्लीगेट जवळील अद्यापक शास्त्र महाविद्यालय येते सखी मतदान केंद्र करण्यात आली होती या ठिकाणी विषेशतःमतदानकेंद्र सजविल्याचे पहायला मिळाले. शिवाय येथे सेल्फी पॉंईंटही उभारण्यात आले होते. तेथे फोटो काढण्याचा आनंदही मतदारांनी लुटला. तर नागदेवळे परिसरात मतदान यंत्र बिघडल्याने तेथील काही मतदारांना माघारी फिरावे लागल्याने त्यांचा काहीसा हिरमोड झाला. तर शहरातून मात्र अनेक खासगी आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी खास वेळ उपलब्ध करून दिला तर अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार आजच्या पुरते बंद ठेवून लोकशाहीच्या सर्वोच्च उत्सवात आपलाही सहभाग नोंदविला दुपारनंतर 1 ते 3 वाजे पर्यंत मतदानाचा वेग पुन्हा काहिसा मंदावला मात्र दुपारी साडे तीन पासून पुन्हा मतदारांचा ओघ सुरू झाल्याचं पहायला मिळालं. सायंकाळी भिंगारमधील एका मतदान केंद्रावर गर्दी वाढल्याने तेथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला . तेथे उशीरापर्यंत मतदान सुरू ठेवण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत येथे मतदान सुरू होते. भिंगार भागातून काही मतदारांची नावे वगळळ्याच्या तक्रारी ही आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.