सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 53 नागरिकांना दहा दिवसांनंतर मंगळवारी घरी सोडण्यात आले. एकूण 663 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
घरी सोडण्यात आलेल्या करोनामुक्त नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील 27, खंडाळा, खटाव, महाबळेश्वर, कोरेगाव, माण या तालुक्यांमधील प्रत्येकी एक, सातारा तालुक्यातील दहा, पाटण तालुक्यातील सहा व वाई तालुक्यातील पाच नागरिकांचा समावेश आहे.