राज्यातील 53.5 टक्‍के पुरूषांचे अविवाहित जीवन

उत्तर प्रदेशात सर्वाधिक अविवाहित पुरूष

मुंबई – राज्यातील लोकसंख्या वाढीवरून चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे राज्यातील 53.5 टक्‍के पुरूष हे अविवाहित जीवन जगत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे पुरूषांपप्रमाणे 42.5 टक्‍के स्त्रिया देखील अविवाहित आहेत. देशातील अविवाहित पुरूषांचे प्रमाण 54.5 टक्‍के तर स्त्रियांचे प्रमाण 44.8 टक्‍के इतके आहे.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात अविवाहित पुरूष व महिलांची आकडेवारी देण्यात आली आहे. 2016 सालची ही आकडेवारी आहे. राज्यातील 2.4 टक्‍के स्त्रियांचे लग्न वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच लागते.36.5 टक्‍के स्त्रियांचे लग्न 18 ते 20 वर्षांच्या कालावधीत तर 61.1 टक्‍के स्त्रियांचे लग्न 21 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त्‌ वयात झाले आहे.

राज्यातील स्त्रियांचे लग्नाच्या वेळचे सरासरी वय 2001 सालातील 19.9 वर्षांवरून 2016 मध्ये 22.4 वर्षे इतके झाले आहे. अविवाहित पुरूषांची देशात सर्वात जास्त आकडेवारी उत्तरप्रदेशात असून ती 59.7 टक्‍के इतकी आहे. तर सर्वात कमी 46.1 टक्‍के इतकी आंध्रप्रदेशमध्ये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.