दक्षिण आफ्रिकेत पावसाचे 51 बळी 

डर्बन (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेतल्या दोन प्रांतांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किमान 51 जणांचा मृत्यू झाला आहे. ईस्टर्न केप आणि क्वा झूलू नताल या दोन भागांमध्ये ही जिवीतहानी झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे शेकडो जण जखमी झाले असून सुमारे 1 हजार जणांना विस्थापित व्हायला लागले आहे, असे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोंसा यांनी सांगितले.

सरकारी यंत्रणांनी मदत आणि बचाव कार्याला सर्वाधिक वेग दिला आहे. अनेक भागांमधील नागरिकांना या मदतकार्यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे, त्यामुळे जिवीतहानी मर्यादित राहिली असल्याचेही रामफोंसा यांनी सांगितले. डर्बन शहरालाही मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटक बसला आहे. पूराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये घुसले आहे. मृतांमध्ये झांबियाच्या दोन लहान मुलांचाही समावेश आहे. पावसामुळे घराचे छत अंगावर कोसळल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.