चीनमध्ये रसायनिक हल्ल्यात 51 मुले जखमी

बीजिंग – चीनमधील एका बालवाडीमध्ये मुलांवर रासायनिक स्प्रे फवारल्यमुळे तब्बल 54 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 51 लहान बालकांचा समावेश आहे. चीनच्या दक्षिणेकडील युनान प्रांतात ही घटना घडली. चीनमधील शाळा, महाविद्यालयांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या हल्ल्यांमधील हा हल्ला सर्वात भीषण होता, असे माजले जाते आहे.

कलयुआन शहरामध्ये कोंग नावाच्या 23 व्यक्‍तीने हा हल्ला केला. तो बालवाडीच्या कुंपणाच्या भिंतीवर चढला आणि मुलांवर कॉस्टिक सोडा (सोडियम हायड्रोक्‍साईड)चा स्प्रे त्याने फवारला, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

या रासायनिक हल्ल्यात 51 मुले आणि तीन शिक्षक भाजले आणि त्यांना कैयुआन पीपल्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. यापैकी दोघा मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. हा रासायनिक हल्ला झाल्यानंतर 40 मिनिटांनी हल्लेखोराला पकडण्यात आले आहे.

समाजाचा सूड घेण्याच्या मानसिकतेतून त्याने हा हल्ला केला असल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे, मात्र या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.

सोडियम हायड्रोक्‍साईड हा अतिशय अल्कली युक्‍त सोडा आहे. त्यामुळे त्वचेही तीव्र लाही होते. हवेतील कार्बन डाय ऑक्‍साईड शोषून घेत असल्याने या सोड्याच्या भाजण्याच्या जखमा अधिक गंभीर असतात.

समाजावरच्या रागातून काही माथेफिरूंकडून बालवाडी आणि शाळांमधील मुलांवर या रासायनाचे स्प्रे फवारण्याचे हल्ले अलिकडे मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.