सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ५१ जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1746 झाली आहे.
आरोग्य विभागाकडून रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 44, सारीचे 6 आणि प्रवास करुन आलेले 1 अशा एकूण 51 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे…
कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे बु. येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षाचे बालक, कोरेगाव येथील 30 व 36 वर्षीय महिला, वाठार किरोली येथील 17 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला, नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष, चिमणगांव येथील 45 वर्षीय पुरुष,
जावली पुनवडी येथील 47, 34, 55, 48, 55, 47, 42, 50, 61, 47, 62 व 40 वर्षीय पुरुष, कुसुंबीमुरा येथील 30 वर्षीय महिला
सातारा येथील 63 व 69 वर्षीय महिला, जिहे येथील 50, 34, 16 व 46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, रॉयल सिटी येथील 58 व 35 वर्षीय महिला व 8 वर्षाची मुलगी, यादोगोपाळ पेठेतील 32 वर्षीय पुरुष, राधिका रोड येथील 58 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, करंदी येथील 36 वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष,
फलटण तालुक्यातील सरडे येथील 55 व 20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 39 वर्षीय महिला, विंचुर्णे येथील 43 वर्षीय पुरुष,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 65, 23, 45, 70 व 32 वर्षीय महिला,
खटाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला.