IFFI 2019: यंदा गोव्यात रंगणार आतंरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा सुवर्णमहोत्सव

पणजी – या वर्षीचा ५० वा आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा (इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल) गोव्यात रंगणार आहे. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान, हा सोहळा संपन्न होणार आहे. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली आहे.

यंदा या सोहळ्यासाठी रशिया हा भारताशी संलग्नित देश असणार आहे. सिनेसृष्टीतील मानाचा पुरस्कार सोहळा मानल्या जाणाऱ्या या आतंरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात यंदा विविध देशातील २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच २६ विविध भारतीय भाषेतील चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.

दरम्यान, या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले १२ भाषेतील चित्रपटही या सोहळ्यात दाखवण्यात येणार आहेत. यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांना अलिकडेच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ७ ते ८ चित्रपटांचे स्क्रिनिंग या सोहळ्यात होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.