पणजी : युद्धभूमीवर, बंदुक चालवण्यापेक्षा पत्र वाचणारा सैनिक, स्वत: आई होण्यासाठी विधी करायला तयार असणारी दाई, महिलांच्या हक्कांसाठी लढा देणारे सामान्य पुरुष चित्रपट म्हणजे वैविध्य आणि विरोधाभासाचा शोध 50 व्या इफ्फीमध्ये 3 नॉन फिचर चित्रपटांचे दिग्दर्शक एकत्र आले तेव्हा हा विरोधाभास विशेषत्वाने सामोरा आला. ‘सन राईज’ च्या दिग्दर्शिका विभा बक्षी ‘लेटर्स’चे दिग्दर्शक नितीन सिंघल आणि ‘मानवता’ची दिग्दर्शिका किर्ती या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.
‘सन राईज’ या माहितीपटाबद्दल बोलताना विभा बक्षी यांनी लैंगिक अत्याचार हे केवळ हरियाणा वा भारताचाच प्रश्न नसल्याचे सांगितले. हे वैश्विक सत्य आहे असे त्या म्हणाल्या. स्त्री आणि पुरुषांनी या विरुद्ध एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. हरियाणाच्या ज्या भागात महिलांविरुद्धच्या अत्याचाराबाबत आकडेवारी समोर येते, अशा ठिकाणीच आपल्याला महिलांच्या अत्याचाराविरोधातील नायक गवसल्याचे त्या म्हणाल्या. लैगिंक समानता आणि लैंगिक न्याय यात बदल घडवणारे सर्वसामान्य पुरुष आढळल्याचे त्यांनी सांगितले. लैंगिक मुद्यांबाबत मौन सोडणाऱ्या हरयाणातल्या लोकांचे त्यांनी कौतुक केले.
अभिनेता होण्यापूर्वी पत्र वाचून ती ‘लेटर्स’ चित्रपटाची प्रेरणा अभिनेता बनण्याआधी सेन्सॉर करण्याचे काम करणाऱ्या देव आनंद यांच्यापासून मिळाल्याचे दिग्दर्शक नितीन सिंघल म्हणाले. युद्धभूमीवरील सैनिकांच्या भावनांचे प्रतिबिंब या चित्रपटात असल्याचे ते म्हणाले. आपल्या पत्रांमधून आशा जिवंत ठेवणाऱ्या सैनिकांना हा चित्रपट आदरांजली असल्याचे ते म्हणाले. जगभरातील सैनिकांनी प्रत्यक्ष लिहलेल्या पत्रांपासून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. फिचर, नॉन-फिचर किंवा मुख्य प्रवाहातील चित्रपट असा भेद न करता चांगली कथा आणि वाईट कथा असा फरक करायला लागले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ममत्व’मागील संकल्पनेबद्दल बोलतांना दिग्दर्शिका किर्ती यांनी या चित्रपटात मातृत्वाच्या भावनेतील गडद छटा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. रिमा या मुख्य व्यक्तीरेखीला समजलेला मातृत्वाचा अर्थ आणि त्याचा प्रवास या चित्रपटात आहे. मातृत्व आणि गर्भावस्था यांच्याविषयी अनेक दंतकथा असल्याचे त्या म्हणाल्या.
विभा बक्षी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डॉटर्स ऑफ मदर इंडिया (2015)’ या चित्रपटाला सामाजिक समस्यांवरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.