पुणे विभागातील 5 जिल्ह्यांची दिलासादायक आकडेवारी
पुणे – विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील 5 हजार 63 करोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर, विभागात करोना बाधितांची एकूण संख्या 9, 749 झाली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्ण 4,220 आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
87,951 जणांचे घेतले सॅम्पल
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 87 हजार 951 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 82 हजार 544 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 407 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 72 हजार 680 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 9 हजार 749 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पुणे
जिल्ह्यातील 7, 670 करोना बाधितांपैकी 4,350 जण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण 2,334 असून 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 207 जण गंभीर आहेत.
सातारा
जिल्ह्यातील 516 पैकी 158 करोनाबाधित बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 337 आहे. एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर
जिल्ह्यातील 891 पैकी 380 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 427 आहे. तर, आतापर्यंत एकूण 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली
जिल्ह्यातील आतापर्यंत 110 करोनाबाधितांपैकी 57 जण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण 49 असून चौघांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
कोल्हापूर
जिल्ह्यातील 562 पैकी 118 करोनाबाधित बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 439 आहे. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, बाधितांवर उपचार सुरू आहेत.