गणरायाला 501 फळांचा नैवेद्य

ज्येष्ठ चतुर्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव

पुणे  – गाभाऱ्यात फुलांची सजावट, फुलांचे अलंकार, विविधरंगी फळांचा नैवेद्य आणि यामध्ये विराजमान झालेले बाप्पा, असे मनमोहक रूप श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये साकारले होते. निमित्त होते गणेश जयंतीचे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात 501 फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी फळे आणि फुलांची आकर्षक आरास केली होती. दरम्यान, संत्री, मोसंबी, टरबूज, केळी, डाळींब, आंबे, पेर, चिक्कू, अंजीर, अननस, लिची अशा विविधरंगी फळांचा नैवेद्य दगडूशेठ गणपतीला दाखविण्यात आला.

ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेशयाग देखील झाला. फळे आणि फुलांच्या आकर्षक सजावटीसोबतच गणेशाला फुलांचा पोशाख देखील करण्यात आला. त्यामध्ये मुकुट, अंगरखा, शुंडाभूषण यासह विविध अलंकार फुलांमध्ये साकारण्यात आले होते. भक्तांनी ट्रस्टच्या “दगडूशेठ गणपती’ या संकेतस्थळावर, फेसबुक, ट्‌वीटर, यू ट्यूब आणि ऍप येथे श्रींचे ऑनलाइन दर्शन घेतले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.