11 दिवसांत 50 हजार बाधित वाढणार!

राज्य आरोग्य विभागाचा अंदाज, 2 हजार बेड्‌सची तजवीज


दररोज सरासरी 5 हजार बाधित सापडण्याची भीती; साध्या बेड्‌सचे ऑक्‍सिजन बेड्‌मध्ये रुपांतर करणार

पुणे – राज्यातील करोना संसर्गाचा वाढता आलेख पाहता, शासनाच्या अंदाजे अहवानुसार पुढील अकरा दिवसांत ऑक्‍सिजनवरील रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या उपलब्ध ऑक्‍सिजन बेड्‌सच्या तुलनेत 1,131 बेड्‌स कमी आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजन विरहीत जवळपास 5 टक्के म्हणजेच 2 हजार बेड्‌स हे ऑक्‍सिजन बेड्‌समध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पुणे जिल्ह्यात दि. 25 मार्चपर्यंत एकूण बाधित संख्या 4 लाख 92 हजार 690 वर पोहचली आहे. पुढील दहा दिवसांत म्हणजेच 4 एप्रिलपर्यंत ही संख्या 5 लाख 41 हजार 547 वर पोहचेल, असे अनुमान राज्य शासनाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जवळपास 48 हजार 857 बाधित वाढण्याची शक्‍यता असून, सरासरी दररोज 4 हजार 800 ते 5 हजार बाधित सापडतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, सध्या जिल्ह्यामध्ये दररोज सहा ते साडेसहा हजार बाधित सापडत आहेत.

त्या तुलनेत पुढील दहा दिवसामध्ये 60 हजारांच्या पुढे बाधित सापडण्याची भीती आहे. जिल्ह्यातील करोनामुक्त व्यक्तींची संख्या 4 लाख 30 हजार 621 असून, 4 एप्रिल रोजी ही संख्या 4 लाख 70 हजार 728 असेल. मृत्यू संख्या 9 हजार 682 वरून 9 हजार 694 वर पोहचेल. तर सक्रीय बाधित संख्या 45 हजार 959 वरून 61 हजार 125 वर पोहचले. म्हणजेच मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

अशी आहे उपलब्ध बेड्‌सची संख्या
ऑक्‍सिजनविरहित बेड्‌स
आवश्‍यक – 30,563
उपलब्ध – 40,708

ऑक्‍सिजन बेड्‌स
आवश्‍यक – 9,169
उपलब्ध – 8, 038
तुटवडा – 1,131
बेड वाढवणार – 2, 035
आयसीयू बेड्‌स
आवश्‍यक – 1,834
उपलब्ध – 2,926
व्हेंटिलेटर बेड
आवश्‍यक – 1,223
उपलब्ध – 1,523 आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.