मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील करिअरला 5 नोव्हेंबर म्हणजे आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता तसेच अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहे.
Congratulations Pa on completing 50 years in the Film industry. We now await the next 50!
Love you. @SrBachchan #50yrsofSaatHindustaani#50yrsofBachchan#GiveItUpForBachchan— Abhishek Bachchan (@juniorbachchan) November 7, 2019
बॉलिवूडमध्ये 50 वर्षे पूर्ण करणाऱ्या बच्चन यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अभिषेक बच्चनने अमिताभ यांचा तारुण्यातील फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहे की, ‘एक मुलगा म्हणूनच नाही तर अभिनेता आणि चाहता म्हणूनही तुमच्याकडे पाहताना अभिमान वाटतो. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे, समजून घेण्यासारखे आहे. चित्रपटप्रेमींच्या अनेक पिढ्या अभिमानाने सांगतील आम्ही बच्चन यांच्या काळात वाढलो. ‘ अशी पोस्ट अभिषेक बच्चन यांनी केली. सध्या त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.