मालाड दुर्घटनेतील गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत – देवेंद्र फडणवीस

मुंबई : मालाडच्या पिंपरीपाडा दुर्घटनेतील गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

खासदार गजानन किर्तीकर, आमदार सुनील प्रभू यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मालाड-पूर्व पिंपरीपाडा येथील संरक्षक भिंत कोसळून दुर्घटनेतील जखमी आणि मदत व पुनर्वसनाबाबत माहिती दिली.

दुर्घटनेतील सुमारे सत्तर जणांवर उपचार सुरू आहेत. यातील गंभीर जखमींना आणखी आर्थिक मदतीची गरज लक्षात आहे हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा केली.

यावेळी खासदार किर्तीकर, आमदार प्रभू यांनी विविध विषयांसंदर्भात चर्चा करून, त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनही दिले. बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आदी उपस्थित होते.

मुंबई – मालाड पूर्व परिसरात भिंत कोसळली

Leave A Reply

Your email address will not be published.