पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी ५० हजारांचा जामीन मंजूर केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत, तपास अधिकाऱ्याने नोटीस दिल्याशिवाय पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करू नये, तक्रारदार व साक्षीदारांशी संपर्क करून नये, अशा अटींवर हा निकाल दिला. दरम्यान, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे मूळ फिर्यादीचे वकील ॲड. अमेय बलकवडे यांनी सांगितले.
धाडवली (ता. मुळशी) येथे शेतकऱ्यांना मनोरमाने पिस्तुलाचा दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला. यामध्ये मनोरमासह तिचा पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर व दोन पुरुष व दोन महिला बाउन्सरविरोधात पौड पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
पंढरीनाथ कोंडिबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, दौंड) या शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. याप्रकरणी कोठडीत असलेल्या मनोरमातर्फे ॲड. सुधीर शहा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.