सम्राट गायकवाड
पूर्वेकडील तालुक्यांत टंचाई; वाड्यावस्त्यांना 102 टॅंकरने पाणीपुरवठा, माणमध्ये सर्वाधिक भीषण स्थिती
सातारा – जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाळा संपत आला तरी दुष्काळाची भीषणता कायम आहे. माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत अद्याप 107 छावण्यांमध्ये 50 हजार 384 जनावरे दाखल आहेत. त्याचबरोबर 83 गावे अन 625 वाड्यावस्त्यांवर 102 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सरासरी दर पाच ते सहा वर्षानंतर राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण होत असते. त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अपवाद नाही. या भागाकडे एकतर पूर्वमान्सून व परतीच्या पावसाचा शिडकावा होत असतो. यंदाच्या वर्षी पूर्वमान्सूननेदेखील पाठ फिरविल्यामुळे दुष्काळाची भीषणता गेल्या सहा महिन्यांपासून कायम आहे.
सप्टेंबर महिन्याच्या तोंडावर छावण्या आणि जनावरांची संख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी अद्याप 50 हजार जनावरे छावण्यांमध्ये दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक छावण्या आणि जनावरे माण तालुक्यामध्ये आहेत. माण तालुक्यातील 87 छावण्यांमध्ये 38 हजार 783 मोठी तर चार हजार 878 छोटी जनावरे अद्याप दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक जनावरे म्हसवडमधील छावण्यांमध्ये आहेत. म्हसवडमध्ये एकाच छावणीमध्ये चार हजार 996 जनावरे दाखल आहेत. त्यापाठोपाठ पळशीमध्ये पाच छावण्यांमध्ये तीन हजार 359 जनावरे दाखल आहेत.
आंधळी गावातील छावणीमध्ये 474 जनावरे, अनभुलेवाडीत 324, भालवडीमध्ये एक हजार 998, भाटकीमध्ये 762, बिदालमध्ये दोन छावण्यांमध्ये 998, बिजवडीमध्ये 730, बोडके-बोराटवाडीमध्ये 328, बोडकेमध्ये 218, दहिवडीमध्ये 555, दानवलेवाडीमध्ये 527, डंगिरवाडी मोहीमध्ये 172, डंगिरवाडी- थदाळेवाडीमध्ये 160 जनावरे, देवापूरमध्ये 277, ढाकणीमध्ये दोन छावण्यांमध्ये एक हजार एक, धामणीमध्ये दोन छावण्यांमध्ये एक हजार 441, दिडवाघवाडीमध्ये 463, दिवडमध्ये 980, दिवडीमध्ये 202, गोंदवले खुर्दमध्ये तीन छावण्यांमध्ये 554, हवालदारवाडीमध्ये 477, हिंगणीमध्ये 858, इंजबावमध्ये 456, जाधववाडीमध्ये 490, जांभुळणीमध्ये 670, जाशीमध्ये दोन छावण्यांमध्ये 856, कारखेलमध्ये 211, कासारवाडीमध्ये 334, खुटबावमध्ये 303, कुकुडवाडमध्ये 675, कुरणेवाडीमध्ये 235, महाबळेश्वरवाडीमध्ये 537, माळवाडीमध्ये एक हजार 268, मलवडीमध्ये 472 जनावरे दाखल आहेत.
मनकर्णवाडीमध्ये 408 जनावरे, मार्डीमध्ये 476, बोनेवाडी-दत्तनगरमध्ये 329, मोगराळेमध्ये 307, मोहीमध्ये दोन छावण्यांमध्ये एक हजार 122, नरवणेमध्ये 243, पाचवडमध्ये 535, पळसावडेमध्ये 501, पानवणमध्ये 447, पांगरीमध्ये दोन छावण्यांमध्ये 737, पिंपरीमध्ये 378, पिंगळी बुद्रुकमध्ये दोन छावण्यांमध्ये एक हजार सहा, पुळकोटीमध्ये 272, राजवडीमध्ये दोन छावण्यांमध्ये 588, राणंदमध्ये 247, सत्रेवाडीमध्ये 354, शेनवडीमध्ये 179, शेवरीमध्ये 304, शिंगणापूरमध्ये 396, सोकासनमध्ये 736, स्वरूपखानवाडीमध्ये 538, तोंडलेमध्ये 252, थदाळेमध्ये 170, वडगावमध्ये दोन छावण्यांमध्ये एक हजार 184, वडगाव-कोकरेवाडीमध्ये 338, वळईमध्ये दोन छावण्यांमध्ये 462, वर-मलवडीमध्ये 665, विरळीमध्ये 401, वडजलमध्ये 125, वाघमोडेवाडीमध्ये 194, वाकीमध्ये 448, वावरहिरेमध्ये दोन छावण्यांमध्ये 682 व येळेवाडीमध्ये 455 जनावरे दाखल आहेत.
माण तालुक्यापाठोपाठ खटाव तालुक्यात 11 छावण्यांमध्ये तीन हजार 75 जनावरे दाखल आहेत. त्यामध्ये एनकूळमध्ये 209, तडवळेमध्ये 399, कणसेवाडीमध्ये 393, पडळमध्ये दोन छावण्यांमध्ये 585, यलमरवाडीमध्ये 401, मांडवेमध्ये 220, हिवरवाडीमध्ये 205, कान्हरवाडीमध्ये 285, धारपुडीमध्ये 200, कातरखटावमध्ये 178 जनावरे दाखल आहेत. त्याचबरोबर फलटण तालुक्यात आठ छावण्यांमध्ये तीन हजार 648 जनावरे दाखल आहेत. त्यामध्ये सर्वाधिक जावलीमध्ये एक हजार 23 जनावरे, सासवडमध्ये दोन छावण्यांमध्ये 983, वडलेमध्ये 607, मिरढेमध्ये 556 आणि दुधेबावीमध्ये 479 जनावरे अद्याप दाखल आहेत. छावण्यांप्रमाणे अद्याप माण, खटाव आणि फलटण तालुक्यांतील 83 गावे आणि 625 वाड्यावस्त्यांवर 102 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
त्यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यात 97 टॅंकर सुरू आहेत. त्यामध्ये दहिवडी महसूल मंडलांतर्गत पांगरी, बिजवडी, बिदाल, तोंडले, वडगाव, येळेवाडी, जाधववाडी, मोगराळे, पाचवड, दहिवडी, स्वरूपखानवाडी, तसेच शिंगणापूर मंडलांतर्गत राजवडी, हस्तनपूर, अनभुलेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, शिंगणापूर, सोकासन व म्हसवड मंडलांतर्गत शिरताव, हिंगणी, धुळदेव, गंगोती, वाकी, धामणी, पळसावडे, दिवड आणि गोंदवेले बदुक्र मंडलांतर्गत पिंपरी, पळशी, पिंगळी बुद्रुक, गोंदवले बद्रुक, जाशी, मार्डी मंडलांतर्गत भालवडी, राणंद, खडकी, भाटकी, रांजणी, वर-म्हसवड, कारखेल, संभुखेड, इंजबाव, हवालदारवाडी, पर्यंती, मार्डी, मोही, शेवरी, खुटबाव, वर-मलवडी मंडलांतर्गत बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, विरळी, पानवन, जांभुळणी, कुरणेवाडी, वळई, वर-मलवडी, चिलारवाडी, पुळकोटी, आंधळी मंडलांतर्गत परकंदी, टाकेवाडी, बोडके, आंधळी, पांढरवाडी, शिंदी बुद्रुक, कासारवाडी, दोरगेवाडी, कुकुडवाड मंडलांतर्गत पुळकेवाडी, ढाकणी आणि कुकुडवाड आदी गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. खटाव तालुक्यात पेडगाव, विखळे, कान्हरवाडी, हिवरवाडी, कातरखटाव (शिंगाडवाडी), डांभेवाडी, येलमरवाडी, कणसेवाडी, खातवळ गावांसाठी तीन टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, घाडगेमळा आणि सासवड गावांमध्ये पाच टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.