पुणे – अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस हे तीन पर्याय असून, त्यापैकी एक प्रत्येक विद्यापीठ निवडणार आहे. अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइनद्वारे होणार असून ती 50 मार्कांची, तर वेळ एक तासाची असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल, कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग संचालक यांच्याकडून शासन परिपत्रक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवले आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.