पुणे – मुळशी धरणातून मुळा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीचे पाणी हिंजवडीतील आजूबाजूच्या परिसरात शिरले आहे. आज हिंजवडीत असलेल्या सूर्या हॉस्पिटलला देखील पूराच्या पाण्याचा तडाखा बसला. पूराचे पाणी सूर्या हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये शिरले होते.
सूर्या हॉस्पिटलमध्ये पाणी शिरल्याची माहिती प्रशासनला मिळताच एनडीआरफच्या टीमला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानंतर लगेगच एनडीआरफ टीमने बचावाचे काम सुरू करून बोटीच्या सहाय्याने हॉस्पिटलमधील 50 रूग्ण आणि 120 कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. त्यानंतर रूग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.