निगडी आगारात 50 नवीन “ई-बसेस’ दाखल

अपुऱ्या जागेमुळे आगारात पार्किंगची समस्या

पिंपरी  – पुणे व पिंपरी-चिंचवड या दोनही शहराची मुख्य वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात बारा मीटरच्या पन्नास “ई-बस’ दाखल झाल्या आहेत. मात्र, आरटीओकडून आद्याप पासिंग न झाल्यामुळे या बसेस प्रत्यक्षात रस्त्यावर उतरण्यासाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. पुढील महिनाभरात आणखी 125 नविन ई-बसेस पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी मिळणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. आगारात आलेल्या पन्नास बसेस गेल्या आठ दिवसांपासून निगडी आगारात पार्किंग केल्या आहेत. यामुळे आगारातील जुन्या बसेसना पार्किंगसाठी अडचण निर्माण झाली आहे.

नवीन आलेल्या बारा मीटरच्या “ई- बसेस’ आरटीओच्या नोंदणीप्रक्रियेत अडकून पडल्या असून, निगडी आगारातील पार्किंग त्यामुळे व्यापले आहे. यापूर्वीही नऊ मीटरच्या दहा बस निगडी आगाराला मिळाल्या होत्या. मात्र, त्या नॉन “बीआरटी’ असल्याने त्यांची धाव मर्यादित आहे. त्यानंतर बारा मीटरच्या पन्नास बीआरटी बस दाखल झाल्या आहेत. त्याची चाचणी व इतर कागदपत्रे पूर्ण करण्यात आली आहेत.

मात्र, आरटीओची परवानगी बाकी असल्याने त्या रस्त्यावर धावण्यास अडकाठी निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत भेकराईनगर आणि निगडीतील जुन्या आगारात ई-बसचे चार्जिंग युनीट आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत आहे. पूर्वी केवळ 25 ई-बस असल्याने दोन्ही आगारात पार्किंगसाठी जागा होत होती. या बस निगडीच्या जुन्या आणि नवीन अशा दोन्ही आगारात पार्क केल्या आहेत. या गाड्या एकाच जागी उभ्या असल्याने दैनंदिन गाड्यांना पार्किंगसाठी अडचण निर्माण होत आहे.

निगडी आगारात बारा मीटरच्या 50 ई-बसेस दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 14 बसचे पासिंग झाले असून, उर्वरित 36 बसची पासिंग प्रक्रीया आरटीओ मार्फत सुरु आहे. आरटीओ प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर त्या बस रस्त्यावर धावतील. पीएमपीच्या वाहतूक विभागाशी चर्चा करुन त्यांचे मार्ग ठरविण्यात येणार आहेत

– सुनील बुरसे, अभियंता, पीएमपी 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)