– विनोद मोहिते
इस्लामपूर – कोरोना काळात रुग्णांना घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी दररोज ५० लिटर डीझेल मोफत मिळणार आहे. रिलायन्स बी.पी.मोबिलीटी कंपनीच्या तर्फे ही सेवा देण्यात येत आहे. इटकरे (ता.वाळवा) येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर ही सोय असेल.
यासंदर्भातचे पत्र पालकमंत्री जयंत पाटील यांना रिलायन्सच्या वतीने संचालक निलेश जाधव यांनी दिले. जिल्हा प्रशासन अथवा जिल्हाआरोग्य अधिकारी कार्यालयाचे पत्र घेवून येणाऱ्या नोंदणीकृत खाजगी अथवा सरकारी रुग्ण वाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती संचालक निलेश जाधव यांनी दिली.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस,पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम दिलीपराव पाटील,नितीन जाधव,निशांत जाधव उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील रिलायन्सच्या सर्व पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.