तेलंगणात पावसाचे 50 बळी

आंध्रमध्येही शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

हैदराबाद- तेलंगणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आलेल्या पुरामुळे पन्नास जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी 11 लोकांचा मृत्यू एकट्या हैदराबादमध्ये झाला आहे, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारकडून देण्यात आली. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

तसेच पावसामुळे नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ज्यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, त्यांना नवीन घर दिले जाईल. जर घराचे अर्धवट नुकसान झाले असेल तर दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंगळवारपासून राज्यात मुसळधार पावसामुळे हैदराबाद आणि इतरत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीने 1350 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. ग्रेटर हैदराबादसाठी 750 कोटी आणि इतर भागात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केसीआरने शेतकऱ्यांसाठी सहाशे कोटी रुपयांची मागणी केली आहे.

आंध्रमध्ये पावसामुळे पीक वाया
आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे 67,864 हेक्‍टरपेक्षा जास्त पिके नष्ट झाली आहेत. या संदर्भात आठ जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्‍चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर, कडाप्पा, कुरनूल आणि श्रीकाकुलममधील पिके नष्ट झाली आहेत.

नुकसान झालेल्या पिकांमध्ये धान, ऊस, मका, नाचणी, कापूस, तंबाखू इत्यादींचा समावेश आहे. बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे, त्यात भाजीपाला, केळी, पपई, हळद, ऊस इ. बहुतेक ठिकाणी शेतांता पुराचे पाणी घुसले. त्यामुळे पिकांचे नुकसान अधिक होण्याची शक्‍यता आहे. राज्यातील किमीचे रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.