पश्‍चिम बंगालमध्ये 50 बॉम्ब जप्त

कोलकाता – पश्‍चिम बंगालमधील कांकिनारा भागातून सोमवारी 50 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मात्र, सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अजय ठाकूर यांनी दिली.लोकसभा निवडणुकांच्या अगोदरपासूनच भाटपारा परिसर कायम अशांत राहिलेला आहे.

रविवारीच या ठिकाणी तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आहे होते. पोलिसांकडू येथील परिस्थिती कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर सद्यस्थितीबाबत बोलताना येथील भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी सांगितले होते की, राज्य आता लढाईच्या मानसिकतेत आहे. राज्यातून लवकरच ममतांना निरोप दिला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.