२६ वर्षांपासूनचा ट्यूमर १७ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढला 

पुणे – ४७ वर्षीय भाग्यश्री मांगले यांचा २६ वर्षा पासून असलेला छाती व खांद्याच्या मधील ट्यूमर काढण्यात ज्युपिटर हॉस्पिटल मधील डॉक्टरांना यश मिळाले आहे. अतिशय दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया यावेळी भाग्याशी यांच्या वर करण्यात आली. खांदा आणि छातीच्या मध्ये आलेल्या ट्यूमर कडे अनेक वर्ष भाग्याशी यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्याचे रुपांतर कर्करोगाच्या ट्यूमर मध्ये झाले.

मुळच्या रोहच्या (जिल्हा रायगड) असणाऱ्या भाग्याशी मांगले या पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उजव्या हाताचे दुखणे व अर्धांगवायूच्या उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या. यावेळी डॉक्टरांच्या असे निदर्शनास आले की त्यांच्या छाती व खांद्याच्या मध्ये २० सेंटीमीटर एवढा मोठा ट्यूमर आहे. हा ट्यूमर त्यांना १९९३ साला पासून असून तो कमी करण्यासाठी त्यांनी काही शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या मात्र त्या अयशस्वी ठरल्या.

त्यांनी एलोपॅथिक व आयुर्वेदिक उपचार केले मात्र कोणताही गुण आले नाही. आता तो ट्यूमर एवढा मोठा झाला होता की त्यामुळे श्वासनलिका दबली जाऊन त्यांना श्वासोच्छवास घेणे अशक्य होत होते. तसेच उजव्या हाताकडे जाणाऱ्या सर्व रक्त वाहिन्या देखील दाबल्या गेल्या होत्या व हात निकामी झाला होता.

यावर हॉस्पिटल मधील सर्जन म्हणाले की ‘अडीच किलोचा हा ट्यूमर खांद्या व छातीच्या अवघड अशा भागात पसरला होता. तो काढण्यासाठी रुग्णाचे कॉलर हाड व छातीचे स्नायू कापावे लागले. तसेच हा ट्यूमर तेथील नसांमध्ये गेला होता. या शस्त्रक्रिये दरम्यान आमची पहिली प्राथमिकता रक्तवाहिन्या वाचवणे व त्याच वेळी कॉलर हाडाचे पुनर्निर्माण करणे ही होती. १७ तास चाललेली ही शस्त्रक्रिया अनोखी असून यात अनेक तज्ञांचे योगदान आहे’.

यावेळी ‘ही पुण्यातील नव्हे तर भारतातील दुर्मिळ केस आहे. पुण्यातील अनेक दिग्गज डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता. मात्र, आता रुग्णाची प्रकृती चिंताजन नसून त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे’.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)